गुजरातच्या अहमदाबादमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांच्या हत्येनंतर मोठी खळबळ माजली होती. पोलिसांनी आता या गुह्याची अवघ्या 48 तासांत उकल केल्याचा दावा केला आहे. या खून प्रकरणातील संशयित आरोपी विनोद मराठी उर्फ विनोद गायकवाड याला गुन्हे शाखेने अटक केली असून, त्याची पुढील चौकशी सुरू आहे.
अहमदाबादच्या ओढव परिसरात एक महिला, तिची 15 आणि 17 वर्षांची दोन मुले आणि महिलेच्या आजीची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी एका घरातून चार कुजलेले मृतदेह ताब्यात घेतल्या नंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद गायकवाड उर्फ विनोद मराठी हा ओढव परिसरात टेम्पो चालवण्याचे काम करतो. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने विनोद आणि त्याच्या पत्नीमध्ये भांडणे होत होती. विनोदला दारू पिण्याची सवय होती आणि त्याला पत्नीच्या चारित्र्यावर देखील संशय होता. कुटुंबात होत असलेल्या सततच्या भांडणांमुळे त्याने घरातील सर्व सदस्यांची हत्या केली. व मृतदेह घरातच टाकून पळ काढला.
या घटनेनंतर आरोपी सुरतला पळून गेला. त्यानंतर तो सुरत सोडून इंदूरला गेला. आरोपी इंदूर सोडण्याच्या प्रयत्नात असतानाच गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला पकडले. घटनेच्या 48 तासांच्या आतच अहमदाबाद क्राइम ब्रँचने हत्येप्रकरणी विनोद याला अटक केली.
आरोपी आता या चारही खुनांबद्दल आपले स्टेटमेंट सतत बदलत आहे. आपण एकाही प्रत्यक्षदर्शीला सोडू इच्छित नसल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांची हत्या केल्याचे आरोपीने गुन्हे शाखेला सांगितले आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोदने पत्नी, दोन मुले आणि आजी यांची हत्या केली. विनोदने त्याच्या आजीवर यापूर्वी देखील हल्ला केला होता. मात्र, मुलीचा विचार करून सासूने या हल्ल्याची माहिती कोणालाही दिली नाही.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…