बुधवार, दि.३०.०३.२०२२ रोजी पंढरपूर येथील श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित ‘कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेचा वार्षिक बक्षिस आणि गुणगौरव समारंभ ह.भ.प.डॉ.जयंत करंदीकर आणि संस्थेचे चिफ ट्रस्टी रोहनजी परिचारक यांच्या हस्ते संपन्न झाला.
कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेत वर्षभर विविध स्पर्धा घेण्यात येतात. त्या स्पर्धकांमधून विद्यार्थ्यांना व्यवहारीक जिवनातील व शालेय जिवनातील विविध स्पर्धांना सामोरे जाण्याकरीता प्रोत्साहन दिले जाते. यामध्ये विविध स्पर्धा घेवून वेळोवेळी विद्यार्थ्यांतील लपलेल्या सुप्त गुणांना वाव दिला जातो. या बक्षिस वितरणाच्या सोहळ्याला संस्थेचे चिफ ट्रस्टी रोहनजी परिचारक यांनी महत्वपुर्ण हजेरी लावली.
कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे ह.भ.प. जयंत करंदीकर यांनी विद्यार्थ्यांना अगदी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी तीन आर चा उपयोग कसा करावा? हे अगदी सोप्या भाषेत सांगितले.संस्थेचे चिफ ट्रस्टी रोहनजी परिचारक यांनी विद्यार्थ्यांना बोलताना म्हणाले की, आपली प्रशाला ही विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकासासाठी वैशिष्ट्यपुर्ण स्पर्धांचे आयोजन करत असते त्यामुळे जागतिक स्पर्धेत टिकुन राहण्यासाठी ही एक महत्वाची बाब आहे. तसेच विद्यार्थ्यांनी देखील या होणा-या शालेय स्पर्धांमध्ये हिरीरीने सहभाग घेतला पाहिजे.
या कार्यक्रमास उपस्थित प्रशालेच्या प्राचार्या सोनाली पवार आणि रजिस्ट्रार गणेश वाळके यांनी विद्यार्थ्यांना पुढील जिवनासाठी कौतुक करून भावी आयुष्याकरिता आशिर्वाद दिले. कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पाडण्याकरीता प्रशालेचे शिक्षक मंगेश भोसले यांनी प्रभावी सुत्रसंचालन केले. तसेच बक्षिसाचे सर्व वितरण कविता टीचर यांच्यासह सहकारी शिक्षकांनी उत्तम प्रकारे करण्यास हातभार लावला.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…