मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाची तिच्या वडिलांनी निर्घृण हत्या केली आहे. हत्येनंतर त्याच्या मृतेदहाचे तुकडे करून ते नदीत फेकून देण्यात आल्याची घटना मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यात घडली आहे.
रविवारी येथील अजनल नदीत एक छिन्नविच्छिन्न मृतदेह सापडला. पोलिसांनी तो ताब्यात घेतला. सोशल मीडियावर मृतदेहाचे फोटो व्हायरल झाले आणि तेव्हा मयताची ओळख पटली. तो मध्य प्रदेशमधील सकतापूर येथे राहणाऱ्या 55 वर्षांच्या त्रिलोकनंद या व्यक्तिचा मृतदेह होता.
त्याची अधिक चौकशी केल्यानंतर हे हत्येचं प्रकरण उलगडलं. त्रिलोकनंद याने 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर होता. शनिवारी पीडितेचे वडील आणि मामा त्याला मोटारसायकलवर बसवून अजनल नदीच्या काठाशी घेऊन गेले.
तिथे मासे कापण्याच्या हत्यारांनी त्यांनी त्रिलोकनंदची हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे करून नदीत फेकले. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्रिलोकनंद हा पीडितेचा नातेवाईक होता, अशीही माहिती पोलिसांना मिळाली असून पुढील तपास सुरू आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…