पंढरपूर नगर पालिकेत नगर रचना विभागाच्या प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकाऱ्याकडून सर्वसामान्य जनतेची मोठी अडवणूक होत असल्याची चर्चा मागील २ वर्षाच्या कालावधीत सातत्याने होत आली होती.बांधकाम परवाने आणि वापर परवाना निर्गमित करण्याचे अधिकार या नगर रचनाच्या अधिकाऱ्याकडे असल्याने मनमानी पद्धतीने कारभार केला जातोय अशा तक्रारी वेळोवेळी सामान्य नागिरकांकडून करण्यात येत होत्या.बांधकाम परवाना अथवा वापर परवाना प्राप्त करण्यासाठी दिवसा पालिकेत हेलपाटे आणि रात्रीच्या वेळी ठरविक ठिकाणी गाठीभेटी घेतल्या शिवाय काम मार्गी लागत नाही असाच अनुभव अनेकांना आला होता.तर नगर पालिकेकडे बेकायदा बांधकाम,अतिक्रमण अथवा नगर पालिकेच्या जागेची परस्पर विक्री,भाडेकरार या बाबत सर्वसामान्य नागिरकांनी केलेल्या तक्ररीची दखल घेत कारवाई केली जात नसल्याने मोठी नाराजी व्यक्त होत आली होती.एकीकडे गोरगरिबांच्या फूट दोन फुटाच्या अतिक्रमणावर तातडीने कारवाई तर दुसरीकडे धनाढ्य नागिरकांचे बांधकाम,अतिक्रमण याचा ”अभ्यासपूर्ण” शोध घेऊन नोटिसीच्या माध्यमातून घडामोडी घडत आल्याचे दिसून आले.याचीच कानोकानी खबर थेट मुख्याधिकारी अरविंद माळी याना प्राप्त होताच त्यांनी नगर रचनाच्या प्रतिनियुक्त अधिकाऱ्याकडे असलेली महत्वपूर्ण जबादारी काढून घेतली असल्याचे समजते.
पंढरी वार्ताकडून या याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सह.नगर रचना संचालक श्री वि.बा.शेंडे पुणे यांच्याकडे विचारणा केली असता तक्रारदार चंद्रकांत गावठे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच लोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे वेळावेळी दाखल केलेल्या तक्रारीच्या प्रतीसह आमच्याकडे कारवाईसाठी अर्ज दाखल केला असून या बाबत नगर रचना विभागाकडून मुख्याधिकारी नगर परिषद पंढरपुर याना चौकशीचा अहवाल पाठविण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती श्री वि.बा.शेंडे यांनी दिली आहे.
मात्र सह संचालक नगर रचना पुणे यांच्याकडे तक्रार देऊन अनेक महिने लोटल्यानंतरही पंढरपूर नगर पालिकेतील संबंधित नगर रचनाचे स्वप्नील डोके व अतुल केंद्रे यांच्या बाबत कुठलीही कारवाई होत नसल्याने तक्रारदार चंद्रकांत गावठे यांनी २४ मार्च २०२२ रोजी पुन्हा एकदा स्मरणपत्र क्रमांक ५ पाठवले असून पंढरपूर नगर पालिकेचे नगर रचना अधिकारी अतुल केंदे व स्वप्नील डोके हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशास कचऱ्याची टोपली दाखवत असून त्यांच्यावर कारवाई न झाल्यास कोणत्याही क्षणी आत्मदहन केले जाईल असा इशारा दिला आहे.
उपरोक्त नगर रचना विभागाच्या दोन्ही अधिकाऱ्यांबाबत सह संचालक नगर रचना विभाग पुणे यांनी दिलेल्या पत्रानुसार अहवाल अध्याप पाठिविण्यात आला नसल्याचे समजताच पंढरपूर नगर पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्याशी संपर्क करून विचारणा केली असता सध्या आम्ही मार्च अखेरच्या राड्यात असून पुढील एप्रिल महिण्याच्या पहिल्या सप्ताहात या बाबत अहवाल पाठवून देणार आहोत अशी माहिती त्यांनी पंढरी वार्तास दिली आहे.
मात्र तूर्तास तरी नगर रचनाच्या पंढरपूर नगर पालिकेत प्रतिनियुक्तीवर असलेल्या त्या दोन्ही अधिकाऱ्याकडून ”मोलाची’ जबाबदारी नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांनी काढून घेतल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…