ताज्याघडामोडी

हळदी समारंभात नाचताना हवेत गोळीबार; नवरदेवासह मित्रांविरोधात गुन्हा दाखल

अंबाजोगाई येथील एका मंगल कार्यालयात आयोजित हळदी समारंभात नाचताना हवेत गोळीबार केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने घटना उघडकीस आली आहे.

याची दखल घेत सरकारच्या वतीने पोलीस नाईक यांनी तक्रार दिली असून त्यावरुन नवरदेवासह त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शांत शहर म्हणून ओळख असलेल्या अंबाजोगाईत या घटनेने खळबळ उडाली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंबाजोगाई जवळील केज रोडवर असलेल्या सायली लॉन्स येथे शनिवारी बालाजी भास्कर चाटे (रा.साकुड, ता.अंबाजोगाई) याचा हळदी समारंभ आयोजित करण्यात आला होता.

यावेळी नवरदेव बालाजी हा आपल्या मित्रांसह नाचून आनंद साजरा करताना अतिउत्साहत बेकायदेशीर रित्या जवळ बाळगलेल्या पिस्टल अथवा रिव्हालवर मधून हवेत गोळीबार केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही घटना उघडकीस आली.

याची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेत सायली लॉन्स येथील सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज तपासले असता त्यामध्ये बालाजी भास्कर चाटे (रा.साकुड), शेख बाबा (रा.क्रांती नगर, अंबाजोगाई) व इतर दोन ते तीन जण दिसत असून अकरा वाजण्याच्या सुमारास शस्त्राने हवेत गोळीबार केल्याचे दिसून येत आहे. हे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी पोलीस नाईक गोविंद अंगद यलमटे अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे यांच्या तक्रारीवरून बालाजी भास्कर चाटे, शेख बाबासह इतर दोन ते तीन अनोळखी व्यक्तींवर इतरांच्या जीविताला धोका होईल असे कृत्य केले म्हणून तसेच शस्त्र अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने मात्र अंबाजोगाई शहरात खळबळ उडाली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात सेन्सर्सचे एम्बेडेड सिस्टिम्ससोबत एकत्रीकरण विषयावरील कार्यशाळा संपन्न

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय (कोर्टी, पंढरपूर) येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग व…

1 day ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट चे प्राध्यापक अनिल बाबर यांना पीएचडी पदवी प्रदान

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख…

6 days ago

एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी-पंढरपूर येथे आधुनिक नियंत्रण प्रणालीवरील आमंत्रित व्याख्यान संपन्न

दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी-पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन…

1 week ago

कर्मयोगी किड्स फाउंडेशन स्कूलमध्ये “आनंद बाजार दिवस” मोठ्या उत्साहात संपन्न

कर्मयोगी किड्स फाउंडेशन स्कूलमध्ये आनंद बाजार दिवस अत्यंत उत्साहात साजरा झाला. या बाजारामध्ये नर्सरी ते…

4 weeks ago

कर्मयोगी किड्स फाउंडेशन” स्कूलच्या विद्यार्थ्यांची माऊली फार्म हाऊस, भंडीशेगाव येथे शैक्षणिक भेट

दिनांक 12/01/2026 रोजी कर्मयोगी किड्स फाउंडेशन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी माऊली फार्म हाऊस, भंडीशेगाव येथे शैक्षणिक भेट…

1 month ago