देशासह राज्यावर आलेलं कोरोनाच संकट पाहता गेली २ वर्ष ही लॉकडाऊन मध्येच गेली आहेत. लॉकडाऊनमध्ये देशभरातील शाळा देखील ऑनलाईनच झाल्या होत्या. तसेच परीक्षादेखील ऑनलाईनच घेण्यात आल्या होत्या.
सगळी परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असताना राज्य शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आता उन्हाळी सुट्ट्या रद्द करुन एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील अनेक ठिकाणी शाळादेखील सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा, परीक्षा या ऑनलाईन झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडूनही अनेक मागण्या करण्यात येत होत्या. त्यानुसार एप्रिल महिना आणि रविवारीही शाळा सुरु राहतील. विद्यार्थ्यांचे वार्षिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…