राज्य शासनाने तालुका पातळीवर क्रीडापटूंना व क्रीडाप्रेमींना सरावासाठी सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुल उपलब्ध व्हावे यासाठी ५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानंतर मोहोळ व उत्तर सोलापूर तालुक्यातील क्रीडा संकुलाचे प्रस्तावही तेथील स्थानिक नेत्तृत्वाकडून पाठपुरावा केल्याने जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे सादर झाले.पंढरपुर शहर व तालुक्याचा विचार करता या तालुक्यात विविध क्रीडा प्रकारात नेपुण्य प्राप्त असलेल्या क्रीडापटूंची संख्या मोठी आहे.तरी पंढरपूर तालुका क्रीडा समितीची तातडीने बैठक घ्यावी व क्रीडा संकुलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवावा अशा आशांची मागणी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने तालुका क्रीडा समितीचे प्रभारी अध्यक्ष तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.अशी माहिती या प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष दिनेश गोडसे यांनी दिली.
या बाबत अधिक माहिती देताना दिनेश गोडसे म्हणाले कि,महाविकास आघाडी सरकारने तालुका क्रीडा संकुलास पूर्वी देण्यात येणाऱ्या २ कोटी निधीमध्ये भरीव वाढ करून ५ कोटी निधीची तरतूद केली आहे.पंढरपूर शहरात क्रीडा संकुल व्हावे हि गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे.पंढरपूर तालुका क्रीडा समितीची गेल्या अनेक महिन्यात बैठकच नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे आम्ही या बाबत तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.आणि आम्ही शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे आमचे मार्गदर्शक लक्ष्मीकांत खाबिया यांच्या मार्फत शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत.
हे निवेदन देताना शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान सोलापूरचे जिल्हाध्यक्ष दिनेश गोडसे व सहकारी अण्णा हजारे, संतोष शेळके, कृष्णा घोलप, विठ्ठल शिंदे,वैभव पाटील आदी उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…