ताज्याघडामोडी

…तर मला विजय चौकात फाशी द्या : सुप्रिया सुळे

सीबीआय, ईडी, आयकर या संस्था स्वतंत्र असल्याचा दावा सत्ताधारी करतात मग कोणावर धाड पडणार हे 4-5 दिवस आधी ट्‌विटरवर कसं समजतं? असा सवाल करत खासदार सुप्रिया सुळे यांनी तपास संस्थांच्या गैरवापराबाबत टीकेची झोड उठवली.आमच्याकडून चूक झाली तर मला विजय चौकात फाशी द्या असे आव्हानही त्यांनी दिले.

तपास यंत्रणांच्या छाप्याच्या आधी ट्‌विटरवर सत्ताधारी पक्षाचे नेते जाहीर करतात त्याचे मी तारखेनुसार पुरावे सादर करू शकते, असे सांगून आम्हाला ट्‌विटरवर कोणावर धाड पडणार हे 4-5 दिवस आधीच कसे समजते? एखादा नेता 15 दिवसात तुरुंगात जाणार असे बोलणारे नेते भविष्य सांगणारे आहेत का? कोण आहेत ते, त्यांना कोणावर छापा पडणार हे कसे माहिती होते? अशी प्रश्‍नांची सरबत्तीच त्यांनी केली. लोकसभेत केंद्रीय तपास संस्थांच्या कारभारासह महागाईवर बोलत होत्या.

ट्‌विटरवर या तारखा येतात, याचे दोनच अर्थ निघतात. तुम्ही एकतर मान्य करा की ईडी, सीबीआय या सर्व तपास संस्था सत्तेत असलेल्या लोकांकडून चालवल्या जातात. अमित शाह खरे बोलतात. मला वाटते मी फक्त त्यांनाच याबाबत विचारायला हवे. सरकारमध्ये इतर कोण खरे बोलते याबाबत माहिती नाही.

अमित शाह तर नक्की खरे बोलतात, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपाला टोला लगावला.

दुसरी गोष्ट म्हणजे ही माहिती लिक होत आहे का? जर एक पेपर लिक झाला तर मोठी चौकशी केली जाते. त्या अधिकाऱ्याला तुरुंगात टाकले जाते. आता जेव्हा तुमचे 2 कार्यकर्ते छापे कधी मारणार, तुरुंगात कधी टाकणार याची सर्व माहिती आहे. मी हे सिद्ध करू शकते.

आमच्याकडून चूक झाली तर मला फाशी द्या. इथं नाही, मला विजय चौकात फाशी द्या. आमची चूक झाली तर आमच्यावर खटला चालवा. ईडी, सीबीआयचा गैरवापर चुकीचा आहे. आयुष्य खूप कलाटण्या देते. आम्ही देखील सत्ताधारी बाकांवर बसलो आहोत. कदाचित आमच्याकडून पीएमएलची चूक झालीही असेल, पण म्हणून आम्हाला फाशी देणार का? पारदर्शक काम करा आणि न्याय करा, असेही त्यांनी ठणकावले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

5 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago