ताज्याघडामोडी

महागाईचा भडका! १ एप्रिलपासून औषधांच्या किमतीत होणार वाढ

सततच्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे अक्षरश: कंबरडं मोडलं आहे. या महिनाभरामध्ये दूध, गॅस सिलेंडर, पेट्रोल-डिझेल यांचे दर वाढले.

त्यातच आता औषधांच्या किमती देखील वाढणार आहेत. महागाईचा भडका अजूनही कायम आहे. इंधन दरवाढीनंतर आता जीवनावश्यक ८०० औषधांच्या किंमती वाढणार आहेत. १ एप्रिलपासून अत्यावश्यक औषधांच्या किमती १०.७ टक्क्यांनी वाढणार आहेत.

एप्रिलपासून पेन किलर, अँटीबायोटिक्स, अँटी-व्हायरससह अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार आहेत. सरकारनं शेड्यूल्ड औषधांसाठी १० टक्क्यांहून अधिक वाढ करण्याची परवानगी दिली आहे. उच्च रक्तदाब, ताप, हृदयरोग, त्वचा रोगाच्या उपचारांमध्ये वापरली जाणारी औषधं महागणार आहेत.

वेदनाशामक आणि एँटी बायोटिक फिनायटोईन सोडियम, मेट्रोनिडाझोलसारखी आवश्यक औषधांवरही परिणाम होणार आहे. केंद्र सरकारनं त्यासाठी हिरवा कंदिल दिला आहे. घाऊक महागाई दरात वाढ झाल्यानं औषधांच्या किमती वाढवाव्या लागत असल्याचं नॅशनल फार्मास्युटिकल प्राईसिंग ऑथरिटीनं (एनपीपीए) स्पष्ट केलं आहे.

औषधांच्या किमती वाढवल्या जाव्यात अशी मागणी कोरोना संकट आल्यापासून या क्षेत्रातील कंपन्या करत होत्या. अखेर एनपीपीएनं औषधांचे दर १०.७ टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली. त्यामुळे आवश्यक औषधांच्या किमती वाढतील. कोरोनाची मध्यम ते गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांच्या उपचारांसाठी आवश्यक असलेल्या औषधांचे दरही वाढणार आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

4 weeks ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 month ago