शारीरीक शोषण झाल्यानंतर पिडितेचं लग्न लावून दिल्याचा प्रकार चित्रपटामंधून पाहायला मिळाला आहे. पण असाच काहीसा प्रकार खऱ्या आयुष्यातही झाल्याचं उघडकीस आलं आहे. शारीरिक शोषणातून गर्भवती झाल्यानंतर पीडितेच्या आईवडीलांनी पीडितेचं लग्न त्याच नराधमाबरोबरच लावल्याची धक्कादायक घटना नागपुरामध्ये घडली आहे. पीडिता 12 वर्षांची असून आरोपीचे वय 22 वर्ष आहे.
पीडिता आणि आरोपी शेजारी असून पीडितेची आई नसल्याने वडील कामावर गेल्यावर ती घरीच एकटी राहत होती. याचाच फायदा घेत आरोपीने त्या बालिकेचे लैंगिक शोषण केले. शेजारी राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणाने तिचा फायदा घेत पीडित बालिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिचे शारीरिक शोषण केले. ती गर्भवती झाल्यानंतर दोन्ही कुटुंबाना ही बाब लक्षात आली.
यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी परस्पर समझोता करत पोलिसांकडे तक्रार न करण्याचे ठरविले आणि वयाने 10 वर्ष मोठ्या आरोपी तरुणाचे लग्न 12 वर्षीय मुलीसोबत लावून देण्यात आले. पीडिता चार महिन्याची गर्भवती असल्याने नुकतच तिच्यावर झालेल्या अत्याचाराची आणि त्यानंतर लावण्यात आलेल्या लग्नाची बाब उघडकीस आली.
या प्रकरणी पोलिसांनी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी विरोधात बलात्कार आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली आहे. तसेच सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत पीडितेची विचारपूस करण्यात आली. तिच्यावर अत्याचार झाल्याची बाब दोन्ही कुटुंबीयांनी लपविली.
तसेच कायद्याच्या विरोधात जाऊन तिचे बाराव्या वर्षी लग्न लावले या आरोपाखाली पोलिसांनी आरोपीच्या पालकांविरोधातही बाल विवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, पीडिता चार महिन्याची गर्भवती असल्याने सध्या तिची शारीरिक अवस्था ठीक नसल्याने तिला डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात आले आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…