ताज्याघडामोडी

धक्कादायक! तिसऱ्या मजल्यावरुन ढकलून विवाहितेचा खून, ६ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

लग्नानंतर एक महिना सासरी नांदवल्यानंतर छोट्या-मोठ्या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. यातूनच तिला घराच्या तिसर्‍या मजल्यावरून ढकलून देत ठार मारलं.

ही घटना बीड शहरातील शाहुनगर भागातील उघडकीस आली आहे. या प्रकरणी विवाहितेच्या पित्याने सासरच्या लोकांविरूध्द शिवाजीनगर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवघ्या सहा महिन्यांपूर्वी सुखी संसाराची स्वप्न उराशी बाळगून सासरी पाठवलेल्या आपल्या लेकीचा तिसऱ्या मजल्यावरून फेकून देत खून केल्याच्या घटनेवरून शहरात खळबळ उडाली आहे. बीड शहरातील शाहू नगर भागात यास्मिन शेख हिच्या मृत्युनंतर पतीसह सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल झाला असून पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

इस्लामपुरा भागात राहणारे रहीम शरिफोद्दिन शेख यांची मुलगी यास्मिन शेख हिचा विवाह २६ ऑक्टोबर २०२१रोजी तिचा विवाह शकूर बशीर शेख (२९) याच्याशी लावला होता. शकूर हा मिस्त्रकाम करतो. लग्न होऊन एक महिना उलटल्यानंतर यासमीनला सासरी जाच होण्यास सुरुवात झाली.

गुरुवारी म्हणजे दि २४ रोजी सकाळी ७ वाजता ती घराच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली असल्याचा निरोप सासरच्या लोकांनी दिला. त्यावरून ते तत्काळ तिच्या घरी पोहोचले.

यासमीनला तिसऱ्या मजल्यावरून फेकून संपविल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावरून पती शकूर बशीर बेग, दीर शेख नसीर बशीर, जाऊ सोफेया नसीर शेख विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक बाळराजे दराडे करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

5 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago