ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात व्याख्यान संपन्न

एस. के. एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात बुधवार दिनांक २३ मार्च २०२२ रोजी “क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्स अँड पेटेन्ट फायलिंग” याविषयावर डाॅ. भालचंद्र केळकर व डाॅ. सुहासराव खांबे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.

या व्याख्यानाचे प्रास्ताविक डाॅ. बाळासाहेब गंधारे यांनी केले तर मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी डाॅ. भालचंद्र केळकर व डाॅ. सुहास खांबे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

प्रा. डाॅ. भालचंद्र केळकर बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांनी सोप्यापद्धतीने आडीयामधुन इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्स कसे साकारले जाऊ शकतात. त्यामधून समाजातील समस्या सोडविल्या जाऊ शकतात. याबद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. 

प्रा. सुहास खांबे यांनी पेटंट म्हणजे काय? कोण-कोणत्या विविध प्राॅडक्ट व प्रक्रिया यांना पेटंट मिळते. याशिवाय पेटंट मुळे विद्यार्थ्यांना काय फायदा होऊ शकतो. या बद्दल माहिती दिली.

हे व्याख्यान मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील तृतीय व चतुर्थ वर्षात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी प्रा. धनंजय गिराम सह मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग परिश्रम घेत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago