पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ एका तरुणाची पाच ते सहा जणांनी कोयत्याने वार करुन हत्या केली आहे. एखाद्या सिनेमाला शोभावी अशी ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती लक्ष्मण ढेबे (वय 20, सध्या रा. वारजे, मूळ रा. धनगरवस्ती नांदेड ता. हवेली.) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली असण्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे. बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
मारुती ढेबे हा नांदेड फाट्यापासून नांदेड गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून असलेल्या बालाजी स्क्रॅप सेंटर या दुकानात बसलेला होता. त्यावेळी तोंडाला रुमाल बांधून आलेल्या पाच ते सहा जणांनी त्याच्यावर अचानक कोयत्याने हल्ला केला. या टोळक्याने मारुतीवर कोयत्याने सपासप वार केले. त्यात ढेबे याचा जागीच मृत्यू झाला. मारुतीची हत्या केल्यानंतर हल्लेखोर अल्टो कारने पसार झाले.
वर्दळीचा रस्ता असल्याने हल्ला झाल्यानंतर या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये या घटनेमुळे मोठी दहशत निर्माण झाली आहे. याबाबत माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून हवेली पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…