बलात्काराचा गुन्हा पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या मुलाविरोधात दाखल करण्यात आला आहे. गजा मारणेचा २२ वर्षीय मुलगा प्रथमेश मारणेवर तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अडीच वर्षांपासून पीडित तरुणी आणि आरोपी प्रथमेश मारणे एकमेकांना ओळखत होते. यादरम्यान आरोपीने तरुणीला २७ ऑगस्ट २०२० ते १७ मार्च २०२२ दरम्यान वेगवेगळ्या लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केले. त्यावेळी आरोपीने काही व्हिडिओ तयार केले होते.
पीडित तरुणीने व्हिडिओ डिलीट कर अशी, अनेक वेळा विनंती केली होती. पण आरोपीने काही ऐकले नाही आणि तिला धमकी दिली. सर्व घटनाक्रम पीडित तरुणीने सांगितल्यानंतर आरोपी प्रथमेश गजानन मारणे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे सिंहगड पोलिसानी सांगितले आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…