राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
सध्या राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष पद रुपाली चाकणकर यांच्याकडे असल्यामुळे राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यपद सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवला आहे.
रुपाली चाकणकर यांच्या जागी आता राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला संधी देणार, याची उत्सुकता आहे. चाकणकर या पुण्याच्या महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा म्हणून काम पाहत होत्या. त्यानंतर त्यांना प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा म्हणून संधी मिळाली.
राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी महिला राष्ट्रवादीच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे त्या जागी रुपाली चाकणकर यांना संधी मिळाली होती.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…