विधानभवन मुंबई येथे बैठक संप्पन आ .बबनराव शिंदे यांची माहिती
सोलापूर-पंढरपूर मार्गावरील पंढरपूर-देगांव-चिंचोली-टाकळी-सिकंदर-कुरुल ते रामा-202 ला जोडणारा प्रजिमा 66 या 35 किलोमीटर लांबी असलेल्या रस्त्याचे कामासाठी निधी मिळत नसल्याने आ .बबनदादा शिंदे यांनी अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचना देऊन आपली भूमिका शासनाकडे मांडली.
त्यानुसार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज विधान भवन मुंबई येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून या रस्त्याच्या सुधारणेसाठी तातडीने 40 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून रस्ता वाहतुकीस योग्य करून देण्याचे मान्य केले त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा अशा प्रकारच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत अशी माहिती आ बबनदादा शिंदे यांनी यावेळी बोलताना दिली.
अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री.विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यातून लाखो भाविक पंढरपूर ला येत असून सोलापूर-पंढरपूर मार्गावरील पंढरपूर-देगांव-चिंचोली-टाकळी-सिकंदर-कुरुल ते रामा-202 ला जोडणारा रस्ता प्रजिमा 66 रस्ता हा 35 कि मी चा रस्ता सध्यास्थितीत अत्यंत खराब असून हा पंढरपूर व सोलापूर मुख्यालयास जोडणारा जवळचा मार्ग आहे. परंतू या रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असल्याने रस्त्यांच्या या दुरावस्थेमुळे सातत्याने अपघात घडत आहेत. तसेच खराब रस्त्यामुळे परिसरातील नागरीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या रस्त्याच्या सुधारणेसाठी शासन स्तरावर यासंदर्भात सार्वजनिक बांधकाममंत्री ना.अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक पार पडली. या बैठकीला आमदार बबनदादा शिंदे ,आमदार यशवंत माने ,सचिव (रस्ते),उपसचिव (रस्ते) सां.बा.विभाग,मंत्रालय,मुंबई,मुख्य अभियंता,सा.बां.प्रादेशिक विभाग,कोकण व पुणे, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता सार्व.बांधकाम विभाग, सोलापूर हे उपस्थित होते.
चौकट ..
पुढील कालावधीत रस्त्याचे काँक्रीटकरण होणार ..
पंढरपूर-देगांव-चिंचोली-टाकळी-सिकंदर-कुरुल ते रामा-202 ला जोडणारा रस्ता प्रजिमा 66 कि.मी. 0/00 ते 35/700 या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आलेला असून सदरच्या रस्त्याचा आशियाई विकास बँक अर्थसहाय अंतर्गत फेज 2 मध्ये किंवा राष्ट्रीय महामार्ग मध्ये समावेश करुन कायम स्वरूपी काँक्रीट रस्ता करणेसाठी शासनाकडून पाठपुरावा करून निधीची तरतुद करण्यात येईल असे आश्वासन ना.अशोक चव्हाण यांनी दिले.या रस्त्याचे सुधारणेमुळे या भागातील शेतीमाल पंढरपूर व सोलापूर येथे नेण्यास मदत होणार आहे. तसेच सदर रस्ता बागायती क्षेत्रातून जात असलेने ऊस वाहतुक, शैक्षणिक संकुले,तिर्थक्षेत्र,बाजारपेठा,साखर कारखाने व दवाखाने यांना जोडणारा असल्याने शेतकरी, नागरिक, प्रवाशी यांना लाभ होणार असल्याची माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…