ताज्याघडामोडी

“द काश्मीर फाईल्स”पाहून येणाऱ्या भाजप खासदारावर बॉम्ब हल्ला!!

सध्या देशात “द काश्मीर फाईल्स” या या चित्रपटावरून आरोप-प्रत्यारोपांचा गदारोळ सुरू असताना पश्चिम बंगालमधील नदिया येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

राणाघाटमधील भाजप खासदार जगन्नाथ सरकार यांच्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. आपण “द काश्मीर फाईल्स” हा चित्रपट पाहून परतत होतो, त्यावेळी आपल्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आल्याचे खासदार जगन्नाथ सरकार यांनी सांगितले.

असा घडला प्रकार

पश्चिम बंगालच्या राणाघाट येथून भाजप खासदार जगन्नाथ सरकार यांच्या गाडीवर बॉम्ब हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात त्यांची कार जळाली असून ते सुदैवाने बचावले. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली.

नदिया जिल्ह्यात द काश्मीर फाईल्स हा चित्रपट पाहण्यासाठी खासदार जगन्नाथ गेले होते. हा चित्रपट पाहून परत येत असताना त्यांच्या कारवर हा बॉम्ब हल्ला करण्यात आला. गाडीचा वेग असल्यामुळे गाडीच्यामागे हा बॉम्ब पडला. म्हणून, ते सुदैवाने बचावले, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रपती राजवटीची केली मागणी

राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी या घटनेनंतर खासदार सरकार यांनी केली आहे. राज्य सरकारने लोकशाहीला पायदळी तुडवले असून राज्यात कोणीही सुरक्षित नाही.

म्हणूनच, राज्यातील सध्याची परिस्थिती थांबवण्यासाठी कलम 356 म्हणजेच राष्ट्रपती राजवट लागू करावी. अन्यथा हे सर्व थांबणार नाही, अशी मागणी जगन्नाथ यांनी केली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

4 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

4 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago