राष्ट्राच्या उभारणीत युवकांचे योगदान महत्त्वाचे – सचिव बाळासाहेब यादव

संपूर्ण जगामध्ये एकमेव तरुण देश म्हणून ज्या देशाकडे पाहिले जाते तो आपला भारत देश आहे. आज भारतामध्ये युवकांची संख्या ही सर्वात जास्त आहे आणि ह्या युवकांच्या शक्तीमुळेच आज देश घडत आहे. राष्ट्राच्या उभारणीत युवकांचे खूप मोठे योगदान आहे. राष्ट्र उभारणी साठी आवश्यक असणाऱ्या संस्कारांची सुरुवात ही राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी दशे मध्ये असताना घडत असते. तावशी या गावाला संपूर्ण देश पातळीवर वेगवेगळे पुरस्कार मिळण्याचे एकमेव कारण म्हणजे या गावात असलेली एकीगावातील साक्षरता आणि गावच्या विकासामध्ये युवकांचे असलेले योगदान! या सर्व बाबींमुळेच संपूर्ण देशपातळीवर या गावाचं नाव उज्वल झाले आहे. त्यामुळे या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी संस्काराचे धडे या ठिकाणी घेऊन आपल्या अभियांत्रिकी ज्ञानाचा उपयोग हा आपल्या गावाच्या विकासासाठी करावा. एकूणच राष्ट्राच्या उभारणीत युवकांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे.’ असे प्रतिपादन जय मल्हार शिक्षण मंडळाचे सचिव बाळासाहेब (काका) यादव यांनी केले.

                 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठसोलापूर व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांच्या संयुक्त  विद्यमाने तावशी (ता. पंढरपुर) मध्ये दि.१४ मार्च २०२२ ते २० मार्च २०२२ या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विशेष परिश्रम व संस्कारात्मक स्वरुपाच्या शिबिराचे आयोजन केले असून त्याच्या उदघाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून जय मल्हार शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बाळासाहेब यादव हे मार्गदर्शन करत होते. तावशीचे उपसरपंच अमोल कुंभार यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले. प्रास्तविकात स्वेरीज् इंजिनिअरींगच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे  कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश मठपती यांनी या तब्बल आठवडाभर चालणाऱ्या विशेष श्रमसंस्कार शिबिराची सविस्तर माहिती दिली. या शिबिरात दररोज सकाळी ९ पासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत विविध उपक्रम राबविले जाणार असून त्यात योगासनेसूर्यनमस्कारश्रमदानचर्चासत्र व जनजागृतीप्रबोधनात्मक कार्यक्रम तसेच आरोग्यआजारस्वच्छता यावर मार्गदर्शनवृक्षारोपणवृक्षसंवर्धनग्राम स्वच्छतेचे महत्वमुली वाचवादेश वाचवाप्लास्टिकबंदीजनजागृतीपाणी व्यवस्थापनशैक्षणिक प्रबोधनशिक्षणाची गरज व महत्वलहान मुलांचे हक्क व सुरक्षितता व  शैक्षणिक कार्या संबंधित विविध विषयांवर प्रबोधनपर व ग्रामस्वच्छता विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखालीकॅम्पस इन्चार्ज यांच्या सहकार्याने तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश  मठपती व प्रा. सुभाष जाधव यांच्या नेतृत्वाखाली व प्रा. करण पाटीलअभियांत्रिकीतील रासेयोचे  सत्तरहून अधिक विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. आठवडाभर चालणाऱ्या या उपक्रमासाठी तावशी ग्रामस्थ  देखील सहकार्य करत आहेत. यावेळी तावशीचे सरपंच गणपत यादवजिल्हापरिषद शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल शिखरेजय मल्हार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुभाष यादवमार्केट कमिटीचे संचालक धनाजी यादवमाजी उपसरपंच संजय  यादवपांडुरंग आसबेसदस्य विठ्ठल पिसे,  स्वेरीचे रासेयो चे सल्लागार डॉ. आर.एन. हरिदासप्रा. एस. आर. गवळी,  प्रा. के. एस. पुकाळेप्रा. ए. एम. कस्तुरेप्रा. टी.एस जोशीप्रा. ए.एस. जाधवप्रा. जी.जी. फलमारीप्रा. एस.बी. खडकेप्रा. टी.डी. गोडसे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago