ताज्याघडामोडी

सासरच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या, पत्नीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा

सासरच्या छळाला कंटाळून उरळीकांचन येथिल एका तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. यासंदर्भात त्याच्या पत्नीसह पाच जणांविरुद्ध पोलिसांनी शुक्रवारी ( दि.१८) गुन्हा दाखल केला.

उरळीकांचनमधील खेडेकर मळा भागात २४ फेब्रुवारीला हा प्रकार घडला. राहुल विलास खेडेकर ( वय ३२, रा. खेडेकर मळा ) हे मृताचे नाव आहे. राहुल व त्याच्या सासरच्या मंडळींची किरकोळ कारणावरून भांडणे होत असत. त्यांच्या छळाला कंटाळून राहुलने २४ फेब्रुवारीला कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

हा प्रकार लक्षात आल्यावर त्याच्या नातलगांनी त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. तेथून दुसऱ्याच दिवशी तो घरी परतला. मात्र, त्याला त्या विषाचा पुन्हा त्रास होऊ लागल्याने त्याला पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान सोमवारी ( दि. १४ मार्च) त्याचा मृत्यू झाला.

राहुलचे वडील विलास खेडेकर यांनी यासंदर्भात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार, राहुलची पत्नी, सासू, मेहुणी व शेजारच्या व्यक्तीविरुद्ध ( सर्व रा. शांतीनगर, वानवडी) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago