सी.एम.एस.इन्फो सीस्टिम लिमीटेड सोलापुर कंपनी तर्फे सर्व राष्ट्रीयीकृत बँकेतुन रक्कम काढुन ठरवुन दिलेल्या ATMमध्ये भरली जाते त्याकरिता काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सी.एम.एस.इन्फो सीस्टिम लिमीटेड सोलापुरचे शाखा व्यवस्थापक सुहास व्यकंटराव कांबळे यांनी पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादी नुसार दि.14/03/2022 रोजी 12/30 वा. चे सुमारास SBI बँक पंढरपुर या शाखेतुन 36,00,000/- रु. कंपणीची गाडी क्र. एम.एच. 43 ए.डी. 8287 यावरील चालक सुरज बनकर, गार्ड करीता ओंकार यादव, ए.टी.एम. कस्टोडियन आशिष मोहन दामजी रा. इसबावी पंढरपुर व अतुल शांताराम धादवड रा. उजनी काँलनी,पंढरपुर हे विविध ठिकाणच्या एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी रवाना झाले. विसावा मंदिर इसबाई पंढरपुर येथील SBI ए.टी.एम. मध्ये 16,00,000/-रु. भरायचे होते. परंतु विसावा मंदिर इसबाई पंढरपुर येथील SBI ए.टी.एम. मध्ये 14,00,000/- रु. भरले. त्यामुळे 2,00,000/- रु. कमी भरलेबाबत फिर्यादीच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी आशीष दामजी यास फोन करुन 2,00,000/- रु. कमी असल्याचे विचारले त्यावेळी आशीष याने माझेकडुन चुकुन दुस-या ए.टी.एम.मध्ये भरले असतील असे सांगीतले.तर महूद येथील एटीएम मधेही ५ लाख रुपये कमी भरल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर फिर्यादी व कंपणीचे इतर कर्मचारी यांचे मार्फतीने 20/00वा पंढरपुर शहरातील सर्व ए.टी.एम. चेक केली त्यावेळी SBI ए.टी.एम. इसबावी येथील मशीनमध्ये 14,11,500/- रु. कमी असल्याचे लक्षात आले. त्यानंतर दि. 16/03/2022 रोजी रात्री 10/30 वा. आशीष दामजी याने फिर्यादीच्या मोबाईलवर फोन करुन ए.टी.एम. मशीन मधुन 20,00,000/-रु. घेतले आहेत मी तुम्हाला उद्या सकाळी आणुन देतो असे म्हणुन फोन कट केला.दि. 14/03/2022 रोजी 12/30 वा. ते दि. 16/03/2022 रोजीचे 20/00 चे दरम्यानं आशीष दामजी याने वरिल रक्कम SBI ए.टी.एम. इसबावी येथील मशीनच्या चावीचा वापर करुन एकुन 16,11,500/-रु. करुन घेवुन जावुन त्याने सदर रकमेचा अप्रामाणिकपणे ,बुद्धिपरस्परपणे अपहार केला आहे. अशा आशयाची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.