ताज्याघडामोडी

डीजेवर नाचता नाचता तरुणानं स्वतःच्याच छातीत खुपसला चाकू

मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तर बाणगंगा परिसरात होळीच्या कार्यक्रमात नाचत असताना एका तरुणाने स्वतःच्या छातीवर चाकूनं वार केले.

यावेळी उपस्थित लोकांनी त्यांना जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात नेले. जिथे त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचवेळी या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

इंदूरच्या बाणगंगा पोलीस स्टेशन हद्दीतील गोविंद कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे. होळीच्या कार्यक्रमात नाचत असताना तरुणाने स्वतःच्या छातीत वार केले.गोविंद कॉलनी येथे राहणारा गोपाल (38) हा तरुण होलिका दहनाच्या कार्यक्रमात डीजेवर नाचत होता. गाण्यावर नाचत असताना त्याने हातात चाकू घेतला आणि छातीवर वार करण्यास सुरुवात केली. यावेळी चाकू गोपालच्या छातीत खोलवर घुसल्यानं त्याच्या छातीतून रक्त वाहू लागले.

बाणगंगा पोलीस स्टेशनचे एसआय योगेश करसिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कुशवाह नगरचे आहे. जिथे होलिका दहनात नाचत असताना गोपाल दर्जी नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. होलिका दहनच्या कार्यक्रमादरम्यान तरुण ‘मैं भी शराफत से जीता मगर’ या गाण्यावर नाचत होता.

यादरम्यान नाचत असताना तरुणाने चाकू काढून स्वत:च्या छातीवर अनेक वार केले, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. अशा स्थितीत जखमी अवस्थेत तरुणाला रुग्णालयात नेले, तेथे त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी एफआयआर नोंदवला

या प्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, मृत गोपालची पहिली पत्नी, मुलगा आणि आई-वडील एकत्र राहतात. त्याने आणखी एका महिलेला सोबत ठेवले आहे. तिच्यासोबत तो नाचत होता. यादरम्यान सर्व मित्रांनी मिळून दारू प्यायली होती. रात्री नाचण्याआधी तो चाकू घेऊन आला होता. मृत गोपालचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी अरबिंदो रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago