Categories: Uncategorized

‘सिल्व्हर ओक’वर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह शरद पवारांची बैठक सुरु

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे लागलेले निकाल तसेच राज्यात होत असलेल्या महत्वाच्या घडामोडींसंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे.

मुंबईतील शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे सायंकाळी सात वाजता ही बैठक होणार आहे. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार , मंत्री छगन भुजबळ , राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आदींसह राष्ट्रवादीचे मंत्री व प्रमुख नेते उपस्थित आहेत. बैठकीस सुरुवात झाली आहे.

होणार महत्वाची चर्चा

पाच राज्यांच्या निकालात भाजपला चार राज्यात बहुमत मिळाले आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर पक्षाच्या भूमिकेत काही बदल राष्ट्रवादीकडून केले जाऊ शकतात. यासह राज्यात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह विद्यमान मंत्री नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून धाडी टाकण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

7 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago