उत्तर प्रदेशात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पोलीस स्टेशनमध्ये ढसाढसा रडणाऱ्या उमेदवाराचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. लाखों रुपये देऊनही पक्षाने तिकीट न दिल्याने हा उमेदवार रडत होता.
त्याने आपली फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. आता या उमेदवाराची बायको पोलीस ठाण्यात पोहोचली असून तिने आपल्या नवऱ्यावर गंभीर आरोप केला आहे. निवडणुकीत तिकीट मिळावं यासाठी नवऱ्याने आपल्याला त्याच्या मित्रांना विकलं असा आरोप या महिलेने केला आहे. माझ्याच घरात माझ्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोपही तिने केला आहे.
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार ही महिला एक क्लिनिक चालवते. तिने आरोप केला आहे की 10 मार्च रोजी तिला निवडणूक मतमोजणी केंद्रावर घेऊन जाण्यास नवऱ्याने नकार दिला होता. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्याच्या काही तासात नवऱ्याचा एक मित्र माझ्याकडे आला आणि त्याने माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली असं या महिलेने म्हटलंय.
याबद्दल जेव्हा मी नवऱ्याला सांगितलं तेव्हा त्याने माझ्यासोबत गैरवर्तन करत मला मारहाण केली असा आरोप या महिलेचा आहे. निवडणूक प्रचारात आपण प्रचंड पैसा ओतला होता, मात्र मी तुझ्यामुळे हरलो असं म्हणत महिलेच्या नवऱ्याने पैशांसाठी मी तुला विकलं आहे असं सांगितलं.
या महिलेने नवऱ्याच्या नातेवाईकांकडेही तक्रार केली होती. त्यांनीही आपल्याला शिवीगाळ केलीअसं महिलेने म्हटलंय. महिलेचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी तिच्या नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…