वर्गात घुसून इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर आरोपीने धारदार शस्त्राने हल्ला केला.
पुण्याच्या वडगाव शेरी हद्दीत ही धक्कादायक घटना घडली असून हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. मुलीवर सिटी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. सध्या या मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय.याप्रकरणी शास्त्रीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
नेमकी घटना काय?
इयत्ता दहावीत शिकणारी ही मुलगी असून आज शाळेत दहावीच्या मुलांचा निरोप समारंभ होता, या निमित्ताने ती आज शाळेत आली होती. यावेळी मुलीवर एकतर्फी प्रेम करणारा मुलगा थेट वर्गात शिरला आणि त्याने मुलीवर हल्ला केला. याआधीही या मुलाने अनेकवेळा त्या मुलीला त्रास दिल्याची माहिती पुढे आली आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…