ताज्याघडामोडी

झोपेत असलेल्या पत्नीची हत्या करताना मुलीने पाहिलं, बापाने तिलाही संपवलं

पत्नी आणि मुलीची हत्या करत कुटुंब प्रमुखाने आत्महत्या केल्याची घटना नागपूरमध्ये समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या एमआयडीसी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या सरोदी मोहल्ल्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.

विलास चंपतराव गवते असं या व्यक्तीचं नाव आहे. विलास गवते यांचा दुग्ध व्यवसाय करत होते. त्यांची आर्थिक परिस्थितीही चांगली होती. त्यांच्याकडे १० दुभती जनावरं होती आणि दुधाचा व्यवसायही चागंला चालत होता. 

पण विलास गवते यांचा स्वभाव काहीसा रागीट होता. त्यातच ते पत्नीवर संशय घेत होते. तिला घराबाहेर जाण्यासही त्यांनी बंदी घातली होती. इतकंच काय तीला कुणाशी बोलूही देत नव्हते. या गोष्टीमुळे घरात अनेकदा वादही झाले. गेल्या काही महिन्यांपासून विलास गवते मानसिकरित्या खचले होते अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

शुक्रवारी मध्यरात्री सर्व कुटुंब गाढ झोपेत असताना विलास गवते उठले आणि त्यांनी पत्नी रंजा हीची गळा चिरुन हत्या केली. पण पत्नीची हत्या करत असताना 10 वर्षांच्या मुलीला जाग आली. तीने घडलेला प्रकार पाहिला. त्यामुळे घाबरलेल्या विलासने मुलीचीही गळा चिरून हत्या केली. जवळच झोपलेल्या 12 वर्षांच्या मुलीला आणि मुलाला मात्र त्याने काहीही केलं नाही.

पत्नी आणि मुलीची हत्या केल्यानंतर विलासने घरातील अंगात असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे जागा झालेल्या मुलाने आई आणि बहिणीला रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं. घाबरलेल्या मुलाने शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांना ही घटना सांगितली. नातेवाईकांनी विलासचा शोध घेतला त्यावेळी त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

नातेवाईकांनी या सर्व घटनेची माहिती पोलिसांना दिली. आर्थिक स्थिती चांगली असूनही एकलकोंडा स्वभाव, आपल्या मनातली गोष्ट कोणाला न सांगणे या सवयीमुळे विलास मानसिक तणाव गेले. त्यातच पत्नीवरील शंकेपायी घरातलं वातावरण बिघडत गेलं. यातूनच विलास यांनी टोकाचं पाऊल उचलत हसत खेळत असलेल्या कुटुंबाची स्वतःच राखरांगोळी केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

7 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago