पुण्यातील तिघा पोलिसांनी थेट भिवंडीत जाऊन एका व्यक्तीच्या साथीने कारवाई करण्याच्या धाकाने स्टिलचा व्यवसाय करणार्या औरंगाबाद येथील व्यापार्याकडील 45 लाख रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी नारपोली पोलिसांनी पोलिस कर्मचारी गणेश बाळासाहेब शिंदे (वय 35, रा. वाणेवाडी, बारामती), गणेश मारुती कांबळे (वय 34, रा. डाळिंब, ता. दौंड), दिलीप मारोती पिलाणे (वय 32, रा. महंमदवाडी) यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, तर व्यापार्याची टीप देणारी व्यक्ती बाबूभाई राजाराम सोलंकी (वय 47, रा. बालाजीनगर) याला अटक केली आहे. गुन्हा दाखल झालेले तिघे पोलिस कर्मचारी दत्तवाडी पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहेत.
ही घटना 8 मार्च रोजी सकाळी पावणेसात ते आठच्या सुमारास नाशिक-मुंबई हायवेवरील दिवेगाव येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर भिवंडी येथे घडली.तांत्रिक विश्लेषणावरून पोलिसांनी माहिती काढली. त्यावेळी सोलंकी पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडे चौकशी केली असता, गणेश शिंदे, गणेश कांबळे व मारुती पिलाणे या तीन पोलिसांच्या साथीने परमार यांना लुटल्याची कबुली दिली. यानंतर तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक चेतन पाटील यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात येऊन चौकशी केली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…