कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यात एका तरुणीनं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणीच्या आत्महत्येनंतर जवळपास दीड महिन्यानंतर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणातून पोलिसांनी मृत तरुणीच्या एका मित्राविरोधात एफआयआर दाखल केली आहे. पोलिसांनी अद्याप संशयित आरोपीला अटक केली नसून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
संकेत पंडित शिखरे असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. तो हातकणंगले तालुक्यातील भादोले येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करवीर तालुक्यातील रहिवासी असणारी मृत तरुणी हातकणंगले तालुक्याच्या एका गावातील खाजगी रुग्णालयात नोकरीला होती. ती वारंवार फोनवर बोलत असल्यानं तिचा संशयित आरोपी संकेतसोबत वाद झाला होता. याच वादातून आरोपी संकेत यानं मृत तरुणीवर चारित्र्याचा संशय घेतला होता.
संबंधित घटना 20 जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत घटनेच्या तपासाला सुरुवात केली होती. पण आत्महत्येचं नेमकं कारण समोर येत नव्हतं.पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संकेत शिखरे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास शाहुपुरी पोलीस करत आहेत.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…