शहरातील उस्मानपुरा भागात एक आगळेवेगळी घटना समोर आली असून, पाच रुपयांच्या गुटख्यामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. तोंडात गुटखा टाकल्यानंतर ठसका लागला ज्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गणेश जगन्नाथ दास ( वय ३७, रा.पद्मपाणी, रेल्वे स्टेशन ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हा एका खाजगी कंपनीत कामाला होते. दरम्यान कंपनीच्या मालकाच्या घरी डिश टीव्ही बसवण्यासाठी ते गेले होते. गणेश यांना गुटखा खाण्याची सवय असल्याने डिश टीव्ही बसवत असताना त्यांनी गुटख्याची पुडी फोडून ती तोंडात घातली. याचवेळी त्यांना जोरोचा ठसका लागला आणि ते बेशुद्ध होऊन पडले.
गणेश बेशुद्ध होऊन खाली पडताच त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी गणेश यांना तपासुन मयत घोषित केले. शुक्रवारी शवविच्छेदनाचा अहवाल आला असून, गणेश यांच्या अन्ननलिकेत सुपारीचा खांड अडकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच समोर आलं आहे. याप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राज्यात गुटखा विक्रीवर बंदी आहे. मात्र असे असतानाही अवैधपणे गुटखा विक्री सर्वच ठिकाणी सुरू आहे. विशेष म्हणजे तरुण मुलंसुद्धा गुटख्याच्या विळख्यात अडकली आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात सर्वच ठिकाणी अशीच परिस्थिती आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…