ताज्याघडामोडी

एक वर्षाच्या चिमुकलीला बापाने जिवंत पुरले, घटना वाचून थरकाप उडेल

एक वर्षाच्या चिमुकलीला जिवंत खड्ड्यात पुरल्याची घटना काल ११ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.रिसोड तालुक्यातील एका निर्दयी बापाने आपल्या एक वर्षाच्या चिमुकलीला जिवंत खड्ड्यात पुरल्याची घटना काल ११ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. सुरेश प्रभाकर घुगे वय २७ वर्ष असं निर्दयी बापाचं नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश हा आपली पत्नी कावेरी सोबत ‘वाडी वाकद’ शिवारात शेतात गोठ्यावर राहत असे. त्यांना तीन मुली आहेत. सुरेश हा नेहमी कावेरीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यातून नेहमीच दोघांची भांडणे व्हायची, त्याला दारूचे व्यसन जडले आहे.

काल पुन्हा त्यांचं कडाक्याचं भांडण झालं त्यात सुरेशने कावेरीला बेदम मारहाण केली. त्यानंतर ती जीव वाचवण्यासाठी गावाकडे पळत गेली व तिने सर्व हकीकत आपल्या दिराला सांगितली. त्यानंतर तिचा दीर व गावातील भावकीची काही मंडळी हे शेतात गोठयावर गेले असता तिथे चिमुकली कुठेही दिसत नव्हती. याबाबत त्यांनी सुरेशला विचारणा केली तर त्याने ही आपली पोरगी नसून आपण तिला जिवंत गाडून टाकले असल्याचे सांगितले. त्याने दाखवलेला खड्डा गावकऱ्यांनी उकरून पाहिला असता त्यात चिमुकली निपचित पडली होती. तिचा मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्रसिंग ठाकूर यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व आरोपी निर्दयी पिता सुरेशला अटक केली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात सहा दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम उत्साहात संपन्न

५० हून अधिक प्राध्यापकांचा सहभाग आणि ५० हून अधिक उत्पादनांची निर्मिती कोर्टी, पंढरपूर | दि.…

20 hours ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 week ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago