पत्नीसह मुलीची गळा चिरुन हत्या नंतर पतीनेही उचललं टोकाचं पाऊल

नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि 13 वर्षीय मुलीची गळा चिरुन हत्या केली आहे. पत्नी आणि मुलीची हत्या करुन आरोपी पतीने टोकाचं पाऊल उचललं आहे. आरोपी पतीने स्वत: देखील गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. नागपुरातील हिंगणा एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या राजीव नगर येथे ही घटना घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागपुरातील राजीव नगर तरोडा मोहल्ल्यात ही घटना घडली आहे. मृतक व्यक्तीचं नाव विलास गवते असल्याची माहिती समोर आली आहे. विलास गवते याने रात्रीच्या सुमारास आपल्या पत्नी आणि मुलीची गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली.

प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून विलास गवते या व्यक्तीने हे कृत्य केलं असल्याचं बोललं जात आहे. मध्यरात्री संपूर्ण गवते कुटुंब झोपलेले होते. त्यावेळी विलास गवते याने आपली पत्नी रंजना आणि 13 वर्षीय मुलीची गळा चिरुन हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

 

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago