‘ माझी शाळा, माझी जबाबदारी ‘अंतर्गत शाळा व्यवस्थापन समिती(SMC) सक्षमीकरण केंद्रस्तरीय दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि.१०/०३/२०२२ ते ११/०३/२०२२ या कालावधित जि.प.प्रा.शाळा कदमवाडी नं. 2 येथे करण्यात आले होते. सुरवातीला या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी तांदुळवाडी ग्रामपंचायत चे उपसरपंच शशिकांत कदम हे उपस्थित होते.त्यांनी क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यशाळेची सुरवात केली. सोबतच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप कदम, ह.भ.प.म. एकनाथ चौगुले, केंद्रप्रमुख शैलजा जाधव,केंद्रीय मुख्याध्यापक मुजम्मील जमादार उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक दिपक परचंडे यांनी केले,ते म्हणाले की,शाळा व्यवस्थापन समिती ही शाळेचा आत्मा व महत्वाचा कणा आहे, यावरचं शाळेचा विकास अवलंबून असतो. अध्यक्षीय भाषणात शशिकांत कदम यांनी ही कार्यशाळा सर्व सदस्यांनी पुर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले.
या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती रचना, कर्तव्ये व जबाबदार्र्या, गुणवत्तापुर्ण शिक्षण व SMC ची जबाबदारी,निपुण भारत अभियान, बालकांचे हक्क व सुरक्षितता, शालेय आपत्ती व्यवस्थापन,शालेय आर्थिक व्यवस्थापन, शाळा विकास आराखडा, शाळेचे सामाजिक अंकेक्षण या विषयावर कार्यशाळेचे सुलभक ज्ञानेश्वर करांडे व बाळूसो लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत तांदुळवाडी व मळोली महसूल मधिल शाळा व्यवस्थापन सदस्यांनी सहभाग घेतला.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती कदमवाडी नं.2 चे उपाध्यक्ष सिताराम खुळे,अमोल माने,सतिश बाबर,सोपान लेंगरे,सुनिल बाबर,दत्ताञय ढोरे,विजय पारसे,सुनिल गायकवाड,प्रांजली कदम,चैताली कदम,मुख्याध्यापक सदाशिव मिसाळ यांनी परीश्रम घेतले. कार्यशाळेच्या शेवटच्या सञात समारोप संतोष काळे यांनी सर्वांचे आभार मानले.
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…
पंढरपूर–‘करिअर करत असताना अपयश आले तरी हरकत नाही, परंतू प्रयत्न मात्र सोडू नयेत. इंजिनिअरिंग पूर्ण…
श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्या…