ताज्याघडामोडी

पत्नीने आत्महत्या केल्याचे कळताच जवानाने ऑन ड्युटी झाडली स्वत:वर गोळी

देशभरात एकीकडे पाच राज्यांच्या निवडणुकीची धामधुम सुरू असताना गडचिरोलीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने आत्महत्या केल्याची बातमी समजताच एक सीआरपीएफ जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरा पोलीस ठाण्यात ही घटना घडली आहे. चंद्रभूषण जगत असं जवानाचं नाव आहे. या जवानाने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात धानोरा पोलीस ठाण्यात केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा कॅम्प आहे. या कॅम्पमध्ये चंद्रभूषण जगत हे जवान कार्यरत आहेत या जवानांचे कुटुंबिय बाहेर गावी मुक्कामाने असते. आज सकाळी या जवानाला त्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याची बातमी समजली.

ही बातमी समजताच कर्तव्यावर असलेल्या चंद्रभूषण याने स्वतःकडे असलेल्या बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केली त्याला रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

चंद्रभूषण हा छत्तीसगड राज्यातील बिलासपूर जिल्ह्यातील रहिवासी असून त्याची पत्नी त्याच्या गावी राहत होती. काही महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्याच्या पत्नीने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी या जवानाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago