डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सोलापूर जिल्ह्याचे तथा महाराष्ट्र राज्य वीज कामगार कॉंग्रेस इंटक संघटनेचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष  डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त   इंटक वीज कामगार संघटना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे इंटक भवन अकलूज येथे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या शिबिराचे उद्‌घाटन डॉ.धवलसिंह यांच्याहस्ते करण्यात आले. यामध्ये सुमारे 75 लोकांनी रक्तदान केले. यावेळी अकलूज येथील पत्रकार प्रमोद शिंदे, खरात, बावीसकर व सरपंच फडतरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी कॉंग्रेसचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष आण्णासाहेब इनामदार, कॉंग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस ह.भ.प. किशोर महाराज जाधव, इंटक संघटनेचे कार्याध्यक्ष, संस्थापक इंटकरत्न  आनंदराव पाखरे, समन्वय समितीचे अध्यक्ष नागनाथ पांढरे, सोलापूर जिल्हा इंटक वीज संघटनेचे जनरल सेक्रेटरी राजाराम घुगे, डेप्युटी जनरल सेक्रेटरी तथा प्रसिद्धी प्रमुख एम.डी.जाधव, इंटक संघटनेचे जिल्हा संघटक ह.भ.प. विठ्ठल फड महाराज, जयकुमार वनकुद्रे, उपजनरल सेक्रेटरी युवराज येलगुलवार , दत्तात्रय रूपनवर व जॉईन्ट सेक्रेटरी राहुल शिंदे, सहाय्यक अभियंता  स्वप्नील लोंढे, श्री शिवशंकर पतसंस्थेचे चेअरमन, प्रदिप सुरवसे,  संचालक राजकुमार भुईटे,  नातेपुते उपविभागाचे उपविभागीय सेक्रेटरी संतोष चव्हाण, पतसंस्थेचे क्लार्क कुलकर्णी, माने व ग्राहक संस्थेचे क्लार्क जम्मा यांच्यासह  इंटक  संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
वीज इंटक संघटनेच्यावतीने वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देवून रक्तदान शिबीर व इतर सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago