भारताची कोरोनाविरोधातील लढाई आता अधिक मजबूत झाली आहे. या लढाईत महत्त्वपूर्व शस्त्र असलेल्या कोरोना लशीच्या यादीत आता आणखी एका लशीचा समावेश झाला आहे.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या कोवोव्हॅक्सला मंजुरी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे या लशीचं 2 ते 11 वयोगटातील मुलांवरही ट्रायल सुरू आहे आणि लवकरच हे ट्रायल पूर्ण होणार आहे. त्यानंतर लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्गही लवकरच मोकळा होण्याची आशा आहे.
Covovax Nanoparticle NVX-CoV2373 ही अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी फर्म Novavax द्वारे विकसित केलेली प्रोटीन-आधारित लस आहे. त्याचा भारतातील सीरम इन्स्टिट्यूटशी करार आहे. भारतात ते Covovax या ब्रँड नावानं ओळखलं जातं. ही लस 90 टक्के प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे.
डीसीजीआयने (DCGI) कोवोवॅक्स लशीच्या आपात्कालीन वापरला परवानगी दिली आहे. प्रौढ व्यक्ती आणि 12 पेक्षा जास्त वयाच्या मुलांना ही लस दिली जाणार आहे. त्यामुळे 12-18 वयोगटातील म्हणजे किशोरवयीन मुलांसाठी आता आणखी एका लशीचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
या लशीचं सध्या 12 वर्षांखालील मुलांवरही ट्रायल सुरू आहे. या लहान मुलांना ही लस कधी दिली जाईल याबाबत लवकरच निर्णय होईल, असं सीरमचे सीईओ आदर पूनावाला यांनी म्हटल्याचं ट्विट एएनआयने केलं आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…