राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. यावर तोडगा काढण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. याबाबत परिवहनमंत्री अनिल परब याबाबत विधानपरिषदेत निवेदन देणार आहे.
दरम्यान, आता मिळालेल्या माहितीनुसार एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती आहे.
सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करायचा की तीन महिन्यांनी करायचा यावर परिवहन विभागाचा अभ्यास सुरू आहे. परिवहन मंत्री अनिल परब उद्या विधिमंडळात याची घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच एसटी कर्मचारी संपाबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे. एसटी संपाबाबत विधान भवनात महत्त्वाची बैठक झाली. ही बैठक विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांच्या दालनात झाली.
एसटी संपाबाबतची सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या चार महिन्यांपासून सुरु आहे. या संपावर तोडगा निघत नव्हता. अखेर आज एसटी संपाबाबत विधानभवनात चांगली आणि सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे.
परिवहन मंत्री अनिल परब विधानपरिषदेत निवेदन करणार आहेत. दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान ते निवेदन करतील. या बैठकीत सर्वपक्षीय आमदारांची समितीचे आणि एसटी कामगार प्रतिनिधींचे एकमत झाल्याची माहिती आहे. त्यामुळे एसटीचा प्रदीर्घ काळ सुरु असलेला संप मिटण्याची शक्यता आहे. विधानपरिषद सभापती बैठकीतून निघालेल्या तोडग्याबाबत सभागृहात माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे हा संप मिटण्याची शक्यता आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…