सांगोला: फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे, संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये “जागतिक महिला दिन” सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
संसारात जीवन जगत असताना दररोजच्या घाईगडबडीतुन एक दिवस तरी स्वतःसाठी मोकळेपणाने जगूया हाच उद्देश घेऊन आजचा “जागतिक महिला दिन” साजरा करण्यामागचा उद्देश होता.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संगीता पाटील होमिओपॅथी कन्सल्टंट , मानसोपचार तज्ञ तसेच सौ. सुरेखा रुपनर, सौ. सारिका रुपनर, संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, शाळेचे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला पालक यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांनी स्वतःकडेही लक्ष दिले पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असे डॉ. संगीता पाटील यांनी उपस्थित महिलांसमोर बोलताना सांगितले.त्याचबरोबर खाण्यात येणाऱ्या पदार्थांमुळे आपल्या शरीराला कोणते फायदे होतात आणि तोटे होतात हेही त्यांनी सुंदररित्या समजावून सांगितले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांनासाठी विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये संगीत खुर्ची, नृत्य, गायन, कोडी, उखाणा इत्यादी प्रकार ठेवण्यात आले होते.या खेळामध्ये महिलांनी उस्फुर्तपणे सहभाग घेऊन या खेळाचा मनमुराद आनंद घेतला. या स्पर्धेमध्ये जिंकलेल्या महिलांचे भेटवस्तू देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.या कार्यक्रमाला महिला पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मृणाल राऊत, सौ. शितल बिडवे आणि सौ. शितल लिगाडे यांनी केले. व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.किरण कोडक यांनी केले. या कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील व पर्यवेक्षक सौ. वनिता बाबर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…