ताज्याघडामोडी

पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला बहुमत, तर गोव्यात भाजपा मोठा पक्ष

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडल्यानंतर पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली असून, आता सर्वांना निकालाची उत्सुकता आहे.

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण ४०३ जागा आहेत आणि बहुमताचा आकडा २०२ आहे, उत्तराखंडमध्ये ७० जागा आहेत आणि बहुमताचा आकडा ३६ आहे. त्याचप्रमाणे पंजाबमध्ये एकूण जागा ११७ आहेत आणि बहुमताचा आकडा ५९ आहे.

तर, गोव्यात विधानसभेच्या एकूण जागा ४० आहेत आणि बहुमताचा आकडा २१ आहे. दुसरीकडे, मणिपूरमध्ये विधानसभेच्या जागांची संख्या ६० आहे आणि बहुमताचा आकडा ३१ आहे. १० मार्च रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. मात्र तत्पूर्वी एक्झिट पोलनुसार निकाल जाहीर झाले आहेत. पाहूयात विविध एक्झिट पोलनुसार पंजाब आणि गोव्यात काय असणार आहे परिस्थिती

एक्झिट पोलनुसार

पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला ७६ ते ९० जागांसह बहुमत मिळणार आहे. तर, काँग्रेस १९ ते ११, अकाली दल ७ ते ११, भाजप आघाडीला १ ते चार जागा मिळणार असल्याचे चित्र आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

3 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago