ताज्याघडामोडी

पत्नीला मेकअप नाही आवडला; पालिकेच्या अभियंत्यानं थेट ब्युटी पार्लरवर बुलडोझर चालवला

हरयाणाच्या गुरुग्राममध्य एक अजब घटना घडली आहे. महापालिकेच्या एका कनिष्ठ अभियंत्यानं एका सलूनवर बुलडोझर चालवला आहे. सलूनमध्य कोणतंही बेकायदेशीर काम चाललेलं नव्हतं. अतिक्रमणदेखील झालेलं नव्हतं.

पण तरीही अभियंत्यानं सलूनवर तोडक कारवाई केली. कनिष्ठ अभियंत्याची पत्नी ब्युटी पार्लरमध्ये मेकअपसाठी गेली होती. पत्नीला मेकअप आवडला नाही. त्यामुळे अभियंत्यानं सलूनवर थेट बुलडोझर चालवला. प्रकरण चर्चेत येताच प्रशासनानं अभियंत्यावर निलंबनाची कारवाई केली.

सेक्टर ३८ मध्ये असलेल्या कट स्टाईल सलूनमध्ये घडला आहे. शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास महापालिकेचे कनिष्ठ अभियंता राकेश कुमार त्यांची पत्नी आणि अन्य एका महिलेसोबत सलूनमध्ये आले होते, अशी माहिती सलूनचे व्यवस्थापक संदीप कुमार यांनी दिली. त्यांना हवी ती सुविधा द्या, असं सलूनच्या मालकानं सांगितलं. त्यानंतर अभियंता फेशियल करून निघून गेले. त्यांची पत्नी आणि दुसरी महिला तिथेच थांबली, असं संदीप कुमार यांनी सांगितलं.

अभियंत्याच्या पत्नीला ज्या उत्पादनाच्या आधारे मेकअप करायचा होता, ते उत्पादन सलूनमध्ये नव्हतं. कर्मचाऱ्यानं ते उत्पादन मागवण्यास सांगितलं. यादरम्यान महिलेला साडी नेसवण्याच आली. मात्र तिला ती आवडली नाही. हेअर स्टाईलदेखील तिला पसंत पडली नाही. यावरून अभियंत्याच्या पत्नीनं ब्युटिशियनसोबत गैरवर्तन केलं आणि कॉल करून पतीला बोलावलं.

बिलाचे ५ हजार रुपये न देता दोन्ही महिलांना घेऊन अभियंता तिथून निघून गेला. त्यानं एका कर्मचाऱ्याला मारहाणही केल्याचा आरोप आहे. पुढच्या १० मिनिटांत तिथे महापालिकेची गाडी आली. दुकानावरील बोर्ड त्यांनी १० मिनिटांत हटवण्यास सांगितला. त्यानंतर पथकानं बोर्ड तोडला.

सलूनचं नाव असलेले काही फलक रिक्षात टाकले. ते घेऊन पथक तिथून रवाना झालं. या प्रकरणी पोलिसांनी अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अभियंत्याला निलंबित करण्याचे आदेश पालिका आयुक्त मुकेश कुमार आहुजा यांनी दिले आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

3 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

3 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago