एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीवर चाकू हल्ला करुन युवकाने स्वतः विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीला तात्काळ साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.
आरोपीनेही विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची नोंद वाठार पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. निखिल राजे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
एकतर्फी प्रेमातून मुलीवर हल्ला
आरोपी निखिल आणि पीडिता एकाच गावातील रहिवासी आहेत. निखिल अनेक दिवसांपासून तरुणीवर प्रेम करत होता. मात्र तरुणीकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. पीडितेचे सध्या शिक्षण सुरु असून रोज ती क्लासला जात असे. मुलगी आपल्या प्रेमाला प्रतिसाद देत नाही हे पाहून चिडलेल्या तरुणाने तिच्या येण्या-जाण्याच्या वेळेवर पाळत ठेवून आज सकाळी तिला गाठले.
गावातील बस स्टँड परिसरात असलेल्या खाजगी क्लासबाहेर आरोपीने मुलीला गाठले आणि तिच्या पोटात चाकू भोसकला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ तेथे उपस्थित स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले.
मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलीवर हल्ला केल्यानंतर आरोपी तरुणाने विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर तो स्वतःहून कोरेगाव पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलिस पुढील कारवाई करत आहेत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…