ताज्याघडामोडी

फडणवीसांच्या गाडीवर भिरकावली चप्पल, राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

पिंपरी चिंचवडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये विकासकामांच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस आले असताना हा प्रकार घडला आहे. 

या कार्यक्रमाआधीच भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने मोठा गोंधळ उडाला होता. यावेळी तणाव निर्माण झाल्यानंतरे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज केला होता.

याआधी एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते समोरासमोर आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकमेकांसमोर आल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत लाठीचार्ज केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या एका कार्यक्रमादरम्यान हा सर्व प्रकार घडला आहे.

देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी आल्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर गर्दीमधून फडणवीसांच्या गाडीवर चप्पल फेकण्यात आली. मात्र चप्पल फेकणारी व्यक्ती कोण होती हे समोर आलेले नाही. भाजपा कार्यकर्त्यांकडून मोदींचा नारा दिल्यानंतर राष्ट्रवादीकडून मोदींविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज केला.

पिंपरी चिंचवडमध्ये विकासकामांच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस दाखल झाले होते. महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने आणि नगरसेवकांचा कार्यकाळ संपत असल्याने विकास कामांच्या उद्घाटनांचा सपाटा लावण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूर्णांनगर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने उभारलेल्या उद्यानाचे उद्घाटन होणार होते. त्याचवेळी भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन राष्ट्रवादीने उद्यानाच्या समोरच झेंडे, काळ्या भीती दाखवून भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी करत आक्रमक पवित्रा घेतला.

त्यांच्याविरोधात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुढे येऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर मोदी, मोदी अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी समोरासमोर आले. त्यामुळे तणाव आणखी वाढला. यामुळे पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

3 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

7 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago