नागपूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये दहावीची तोंडी परीक्षा देऊन परत येत असताना एका विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला आहे.
या विद्यार्थ्याच्या बाईकला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक यामध्ये बाईकवरील एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे तर इतर दोघे जण जखमी झाले आहेत. कामठी-नागपूर मार्गावर मोहंमद अली पेट्रोल पंपासमोर हि दुर्दैवी घटना घडली आहे.
दिशांत महादेव पटेल असे या अपघातात मृत पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तसेच मयंक कुमार सिंग आणि आरव चौधरी हे विद्यार्थी या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेले विद्यार्थी जीपीएस आर्मी पब्लिक स्कूलचे होते.
नेमकं काय घडलं?
कामठी-नागपूर मार्गावर मोहंमद अली पेट्रोल पंपासमोर ही दुर्दैवी घटना घडली आहे. दहावीची तोंडी परीक्षा देऊन परत येताना ही घटना घडली आहे. या अपघातात बाईकवरील एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एकाचा मृत्यू, दोघे जखमी
या अपघातात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव दिशांत महादेव पटेल असे आहे. तर मयंक कुमार सिंग आणि आरव चौधरी हे विद्यार्थी या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. हे सगळे विद्यार्थी जीपीएस आर्मी पब्लिक स्कूलचे होते. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…