पंढरपूर- आज शनिवार, दि. ०५.०३.२०२२ रोजी कर्मयोगी किड्स फॉउंडेशन स्कूल पंढरपूर येथे मोफत कौशल्य विकास शिबीर आयोजनाचा सांगता समारंभ पार पडला. मागील दोन वर्षांपासून कोरोना मूळे शाळा बंद असल्यामुळे लहान मुलांना शाळेत जाता आले नाही. त्यामुळे अशा मुलांसाठी सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन रोहन परिचारक सर (ट्रस्टी कर्मयोगी प्रतिष्ठान पंढरपूर ) यांच्या संकल्पनेतून अशा विद्यार्थ्यांसाठी २० दिवसांचे मोफत कौशल्य विकास शिबीर घेण्यात आले.शिबिराची सांगता मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रमाणपत्रे देऊन करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री गुरुदास अभ्यंकर ( नगरसेवक पंढरपूर नगरपालिका पंढरपूर) ,श्री नारायण शिंगन ( नगरसेवक पंढरपूर नगरपालिका पंढरपूर) व सौ सोनाली पवार मॅडम ( मुख्याध्यापिका कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर ) उपस्थित होते.२० दिवसांच्या मोफत कौशल्य विकास शिबिरामध्ये पाम पेन्टिंग,पाम ड्रॉईंग, ड्रॉईंग थ्रू शेपस, डान्स, म्युजिक, कलर्स डे इत्यादी गोष्टी शिकवण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन कर्मयोगी किड्स फॉउंडेशन स्कूलच्या शिक्षकांनी केले.संपूर्ण कार्यक्रमाकरिता कर्मयोगी विद्यनिकेतन स्कूल व कर्मयोगी किड्स फॉउंडेशन स्कूल शिक्षक वर्ग व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…