भाजप सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी संदीप माने यांची निवड

भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी संदीप सुभाष माने यांची निवड करण्यात आली आहे.भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत मा.आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी ,युवक नेते प्रणव परिचारक, तालुका अध्यक्ष भास्कर कसगावडे ,सोमनाथ अवताडे,बादलसिंह ठाकुर, धीरज म्हमाने,यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवडीनंतर संदीप माने यांचे अभिनंदन केले जात असून या पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पंढरी वार्ताशी बोलताना त्यांनी या निवडीबद्दल आभार मानत पक्षाने सोपविलेली जबाबदारी आपण अहोरात्र परिश्रम घेऊन निष्ठेने पार पाडू व केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ,या समाजाचे प्रश्न यासाठी मा.आ.प्रशांत परिचारक तसेच उमेशराव परिचारक यांच्यासह सर्वच जेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेऊ अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago