रशिया-युक्रेन युद्धाची व्याप्ती वाढतच चालल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकले आहेत. ब्रेंट क्रूडचे प्रतिबॅरलचे दर आता 117 डॉलर्सवर गेले असून, परिणामी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून येत्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेल दर लिटरमागे 25 ते 30 रुपयांनी वाढविले जातील, अशी शक्यता आहे.
इंधन दरवाढीचा फटका बसू नये, यासाठी अनेक देशांनी त्यांच्या ‘स्ट्रॅटेजिक ऑईल रिझर्व्ह’चा (धोरणात्मक तेलसाठा) आसरा घेतला आहे. 2 डिसेंबर 2021 रोजी जागतिक बाजारात क्रूड तेलाचे प्रतिबॅरलचे दर 70 डॉलर्सच्या आसपास होते. नंतर अवघ्या तीन महिन्यांत हे दर 117 डॉलर्सच्या स्तरावर गेले आहेत. क्रूड तेलाच्या दरात झालेली ही वाढ 57 टक्क्यांची आहे. अर्थातच, क्रूड तेलाचे दर भडकल्याने अनेक देशांची अर्थव्यवस्था डगमगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इंधन दरवाढीपासून नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर 2021 रोजी एक्साईज कर कमी केला होता. त्यापाठोपाठ अनेक राज्य सरकारांनीदेखील आपले कर कमी करत नागरिकांना दिलासा दिला होता. आता पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही आटोपल्या आहेत. लवकरच नागरिकांना पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे.
दरवाढ तर होणारच…
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल बॅरलमागे एका डॉलरने जरी वाढले, तरी देशात लिटरमागे पेट्रोल, डिझेलचे दर 55-60 पैशांनी वाढतात. डिसेंबर 21 मध्ये कच्च्या तेलाचे दर 70 डॉलर्स प्रतिबॅरल होते, आता ते 117 डॉलर्सवर गेले म्हटल्यावर दरवाढ होणारच.
रशियावरील निर्बंधांचा परिणाम
रशिया कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा मोठा उत्पादक देश आहे. रशिया 50 लाख ते 60 लाख बॅरल कच्चे तेल निर्यात करतो. युक्रेनवरील आक्रमणामुळे रशियावर निर्बंध लादण्यात आल्याने पुरवठ्याला त्याचा फटका बसला आहे. अर्थात, भारत कच्चे तेल रशियातून फारसे मागवत नाही; पण या गोष्टीचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरावर झाला आहे. त्याचा फटका भारताला बसेलच. भारतातील कच्च्या तेलाची 85 टक्के गरज ही आयातीवर अवलंबून आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…