उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकांचं नाव सांगून जमीन व्यवहारात फसवणूक केल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा अशी एक घटना घडली आहे.
माझी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पीएसोबत ओळख असल्याचे, सांगून पुण्यातील वारजे भागात राहणार्या एकाची १० लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रविण विठ्ठल जगताप रा.वाई सातारा आणि एक अनोळखी अशा दोन आरोपींची नावे आहेत. त्यातील प्रवीण विठ्ठल जगताप यास अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेमार्फत विविध विकास कामे केली जातात.
त्यापैकी ५ कोटी रुपयांचे बजेट लॉकिंग करून देतो, माझी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए मुसळे यांच्याशी ओळख आहे. तुमचे काम होऊन जाईल, असे आरोपी प्रवीण विठ्ठल जगताप आणि त्याच्या एका साथीदाराने फिर्यादी महेश पटवर्धन याला सांगितले.
त्यावर महेश पटवर्धन यांनी विश्वास ठेवला. त्यानंतर पटवर्धन यांनी आरोपीला १० लाख रुपये दिले. पण तो काही काम करत नाही.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर आरोपी प्रवीण जगताप याला अटक केली असून अधिक तपास सुरू असल्याचे बंडगार्डन पोलिसांनी सांगितलं.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…