शेगाव दुमाला ता.पंढरपुर येथील मारुती आटकळे यांचे शपिंग कम्पलेक्सचे गाळ्यामध्ये ई कॉम एक्सप्रेस लि.या कुरिअर कंपनीचे डिलिव्हरी ऑफिस असून शशिकांत चंद्रकांत तेलकर सध्या रा घर नं 674 अ (3) जुना सरकारी दवाखान्याजवळ, कोळी गल्ली पंढऱपुर हे शाखा प्रमुख म्हणून काम करतात.त्यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादी नुसार दि. 26/02/2022 व दि. 27/02/2022 रोजीचे लोकांनी ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तु कुरीयर करुन मिळालेली रक्कम दोन दिवस बंकेला सुट्टी असल्याने आलेली रक्कम ही या ठिकाणी असलेल्या ऑफिसमध्ये कपाटात आम्ही ठेवली होती.काल दि.27/02/2022 रोजी रात्री 08/30 वा चे सुमारास फिर्यादी नेहमीप्रमाणे ऑफिस बंद करुन त्यांच्या बहीनीचे घरी गेले होते.दि.28/02/2022 रोजी सकाळी 06/00 वा चे सुमारास फिर्यादीस ऑफिस मधील डिलीव्हरी बॉय विनायक रविंद्र पवार याने फोन करुन ऑफिसचे शटर हे उचकटलेले दिसत आहे.असे सांगील्यावर जावुन पाहीले असता ऑफिसचे लोखंडी शटर एका बाजुने उचकटलेले दिसले. ऑफिसमध्ये जावुन पहाणी केली असता ऑफिसध्ये असलेल्या लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडा दिसला कपाटात असलेली रक्कम दिसुन आली नाही. तसेच सदर ऑफिसमध्ये असलेल्या सी.सी.टी.व्ही.चा डि.व्ही.आर. बॉक्स हा ठेवलेल्या ठिकाणी दिसुन आला नाही.
सदर ऑफिसचा लोखंडी दरवाजा तोडुन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आत प्रवेश करुन कपाटात ठेवलेली रक्कम रुपये 1,94,991/- व सी.सी.टी.व्ही.चा डि.व्ही.आर. बक्स चोरुन नेला आहे.अशी फिर्याद शशिकांत चंद्रकांत तेलकर यांनी दाखल केली आहे.या चोरी प्रकरणातील चोरटयांनी या कुरिअर ऑफिसमधील सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर जाताना सोबत नेल्याचे फिर्यादीत नमूद केल्याने चोरटयांनी म्हत्वाचा पुरावाच नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे असेच म्हणावे लागेल.