राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज जळगावात बोलताना म्हटलं आहे की, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे ऊर्जा स्त्रोत आहेत. समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचं माझ्या वाचनात आलं होतं.
मात्र इतिहासातील काही नवीन तथ्य लोकांनी मला सांगितली आहेत. या तथ्यांनुसार मी माहिती घेतो आणि त्यानंतर पुढे काय करायचं तो निर्णय घेतो,’ अशी प्रतिक्रिया जळगावात कोश्यारी यांनी दिली आहे. जळगाव विद्यापीठातील जलतरण तलावासंदर्भातील एका कार्यक्रमाला ते उपस्थित होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर कोश्यारी यांनी वादाबाबत आपली बाजू मांडली आहे.
तुम्ही केलेल्या वक्तव्यावर माफी मागण्याबाबत तुमचा काय विचार आहे, असं राज्यपाल यांना विचारलं असता त्यांनी पत्रकारांशी अधिक बोलणं टाळत निघूण जाणं पसंत केलं.
नेमका काय आहे वाद?
औरंगाबादेतील कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराज काय असते? समर्थ नसते तर शिवाजी महाराजही नसते,’ असं भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं होतं.
गुरूचं महत्व सांगताना आपण हे वक्तव्य केल्याचं राज्यपालांचं म्हणणं आहे. मात्र या वक्तव्यातून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आणि राज्यभर कोश्यारी यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…