छत्तीसगडच्या एका अभिनेत्रीकडून काही दलाल पिंपरी-चिंचवड शहरात वेश्याव्यवसाय करून घेत होते. या अभिनेत्रीसह आणखी दोन महिलांची पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने वेश्या व्यवसायातून सुटका केली.
ही कारवाई बुधवारी (दि. 23) ताथवडे येथील एका लॉजवर करण्यात आली.जितेंद्र हस्तीमल बोकाडिया उर्फ हितेश हस्तीमलजी ओसवाल उर्फ महेश उर्फ विकी (48, रा. वाघोली, मूळ रा. राणी स्टेशन, जि. पाली, राजस्थान), हेमंत प्रणाबंधू साहू (32, रा.पुणे-नगर रोड, वाघाली, मूळ रा. कुसुमुंडिया, दासीपूर, पंगातीरा डिंगालाल परांगजाल, ओडिशा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
त्यांच्यासह मुकेश केशवाणी, करण, युसूफ उर्फ लंगडा शेख यांच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.जितेंद्र आणि हेमंत हे दोघेजण त्यांचे साथीदार मुकेश, करण आणि युसूफ यांच्या सांगण्यावरून लॉजवर मुली पाठवण्याचे काम करीत होते.
संबंधित मुली त्यांच्या नावावर हॉटेलमध्ये रूम बुक करीत असत. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुणे-मुंबई महामार्गावर ताथवडे येथील एका लॉजवर सापळा लावला. त्यानंतर छापा मारून तीन मुलींची वेश्या व्यवसायातून सुटकी केली.
सुटका केलेल्या मुलींमध्ये एक छत्तीसगडची अभिनेत्री आहे. दुसरी राजस्थान, तर तिसरी मुंबई येथील आहे. आरोपींकडून 10 हजार रुपये रोख रक्कम, 9 हजार 500 रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन आणि 100 रुपयांचे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
जितेंद्र यांच्यावर सोलापूर येथे वेश्या व्यवसायप्रकरणी गुन्हा दाखल आहे. हेमंत यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात वेश्या व्यवसाय व लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, तर यूसूफवर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात वेश्या व्यवसायप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…