ताज्याघडामोडी

महावितरण अधिकार्‍याच्या टेबलवर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोडला साप

इचलकरंजी येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्या टेबलवर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज (शनिवारी) चक्क साप सोडला. वीजप्रश्नी राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या आंदोलनात हा भाग असल्याचे सांगण्यात आले. यात सहभागी झालेल्या आंदोलकांवर सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी येथे आंदोलन सुरू केले आहे. काल शासकीय अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांसमोर काचेच्या बरणीतून साप ठेवण्यात आला होता.

तर आज त्याही पुढे जात इचलकरंजी येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांच्या टेबलवर साप सोडण्यात आला. वीजप्रश्नी तातडीने निर्णय न घेतल्यास सापासह अन्य वन्य प्राणी शासकीय कार्यालयात सोडले जातील असा इशारा आंदोलकांनी दिला.

या वेळी आंदोलनात बसगोंडा बिरादार, संजय बेडक्याळे, गोवर्धन दबडे, पुरंदर पाटील, अभिषेक पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर शिरोळ तहसील कार्यालयामध्ये एका शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी मुख्य प्रवेशद्वारातून साप सोडला. त्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरली आहे.

आंदोलकांवर गुन्हा दाखल 

दरम्यान महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांनी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यांमध्ये आंदोलकांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. सरकारी कार्यालयात साप सोडून सरकारी कामात अडथळा आणल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी संजय बेडक्याळे, पुरंदर पाटील, अभिषेक पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आंदोलनात पकडण्यात आलेला साप पोलिसांनी जप्त केला असून, तो वन विभागाकडे अधिवासात सोडण्यासाठी सुपूर्द केला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago