काल रात्री उस्मानाबाद येथील गणेशनगर येथे राहणाऱ्या हणमंत चंद्रकांत अकोसकर या एसटी कर्मचाऱ्याने राहत्या घरी विषारी औषध घेवून आपला शेवट केला.
कोर्टाने पुढील तारीख दिल्याने नैराश्यातून काल रात्री विषारी औषध घेवून हणमंत अकोसकर यांनी आपले जीवन संपवले. ही बातमी समजताच संपावरील कर्मचारी एकत्र आले. मयत हणमंत अकोसकर यांचा मृतदेह उस्मानाबाद आगारात आणून ठेवला आहे. न्याय करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. हणमंत अकोसकर हे वाहक म्हणून तुळजापुर येथील आगारात कार्यरत होते. एसटीचे शासनात विलिनीकरण करा, या मागणीसाठी ११६ दिवसापासून संप चालू आहे. या संपात हणमंत अकोसकर सहभागी होते.
संपात सहभागी असल्यामुळे पगार मिळत नव्हता, आई-वडील पत्नी दोन लहाणं मुले यांची उपासमार होवू नये म्हणून हणमंत अकोसकर हे मजुरी करुन कुटुंबाचा सांभाळ करत होते. मयत हणमंत अकोसकर यांचा मृतदेहापासून कर्मचारी भावूक झाले होते सरकारविरोधी संतप्त भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…